नट सम्राटने १० कोटींचा गल्ला ३ दिवसात जमा केल्याची बातमी ऐकून संमिश्र विचार मनात आले . मराठी प्रेक्षक अजूनही तसाच भावूक आहे अस प्रत्कार्षाने वाटलेलं. तस पाहिलं तर नट सम्राट ही शेक्सपियरच्या ' किंग लिअर ' वर बेतलेली पहिली कलाकृती नाहीये . जगातल्या कितीतरी भाषात त्यावर अगणित कलाप्रकार बेतले गेले आहेत , आपल्याकडेच मराठीत राजा परांजपे आणि सुमती गुप्त्यांचा 'उन पाउस' वा मोहन जोशी सुहास जोशी द्वयीचा 'तू तिथे मी ' किंवा हिंदीत ' बागबान' वा संजिवकुमार माला सिन्हा जोडीचा ' जिंदगी ' येऊन धो धो चालून गेलेले आहेत . मग नट सम्राट चच मराठी मनावर एव्हढ गारुड का ?
त्याच सगळ श्रेय कै . मा . वि वा शिरवाडकरानांच जात . त्यांनी मराठी मनाची नाळ अचूकपणे जोखलेली होती. घडलेली हीच कथा शिक्षकाच्या वा कारकुनाच्या घरात दाखवली असती तर मराठी मनाला ती तितकीशी भावली नसती . मराठी मनाच नाटक वेड लक्षात घेऊन त्यांनी हे नाटक नाटकाच्या दरबारात पर्यायाने नट सम्राटाच्या घरात नेल्याने त्याला जी मिती लाभली ती larger than life झाली आणि तिला भाऊक मराठी प्रेक्षक भुलला नसता तरच नवल . पल्लेदार वाक्य अति अलंकारिक भाषा लांबच लांब स्वगत मधून मधून भरलेले टिपिकल मराठी philosophy चे डोस मराठी मनाला खूप हवे हवेसे वाटतात आणि योग्य प्रमाणात ते दिले कि तो महा खुश होतो. नाटकाच्या बाबतीत ते घडलंच घडलं आता ते सिनेमाच्या बाबतीतही घडतंय . त्यात नाना पाटेकर नट सम्राट मग काय विचारता ? नाटकीय अभिनयात नानांचा हात धरणारा आज तरी डोळ्यासमोर कोणी नाही आणि नट सम्राट सारखं कुरण मिळाल्यावर नाना सुटले नसते तरच नवल . नाटक म्हटल्यावर संयत अभिनयाची अपेक्षाच नसते तिथलं सगळच भव्य दिव्य . त्यामुळे नेहेमीचे संवाद बोलताना नाटकीय ढंगात फेकले तरी मराठी माय बाप प्रेक्षक ते कानात भरभरून घेतो आणि त्यालाच अभिनय समजतो बापडा . मराठी सिनेमान १० कोटी जमविले ह्याचा आनंद नक्कीच आहे पण … पण हा पण मोठा वाईट आहे
No comments:
Post a Comment