Wednesday, 29 March 2017

sacred thread and much more

 जानवे ह्या प्रकाराविषयी काही वाचण्यात आलं म्हणून हा प्रपंच. 
Gypsium ह्या वनस्पतीचा तन्तुजन्य भाग जो  पूर्णपणे cellulose असतॊ त्याला विणून बनविलेल्या धाग्यांपासून बनवलेली एक वस्तू . एक धार्मिक वस्तू. एक हिंदू धार्मिक वस्तू. म्हणजे जानवे. पण त्याविषयी जे वाचलेले आणि त्याला मिळालेल्या likes पाहून हसावो का रडावे तो कळेना. 
 जानव्याला ९ तंतू असतात 
१. पहिला तंतू  ओंकार . ओंकार हा स्वर  आहे . स्वरयंत्राचा विविक्षित वापर करून हा उच्चारता येतो. ह्यात जीभेबरोबर छातीचे गालाचे स्नायूही वापरावे लागतात.  कुठल्याही स्वराला अर्थ भाषा किंवा परंपरा देते. हि परंपरा नसल्यामुळे शांघाईच्या याँग टॉन्गला वा ब्राझीलच्या पेड्रोला ह्या  ओंकाराचे काहीही सोयरे  वा सुतक नाही. आम्हाला आहे कारण संस्कार .थोडक्यात ब्रेन वॉशिंग त्याच प्रमाणे स्वर यंत्राची हालचाल जरी सारखी असली तरी आणि त्यामुळे येणारे उच्चारण जरी सारखे असले तरी भाषापरत्वे दोघांचाही अर्थ अतिशय भिन्न असतो, असू शकतो. 'जून ' ह्या उच्चारणात इंग्लिश कंठ आणि मराठी कंठ सारखेच स्नायू वापरतो पण इंग्लिश मधला अर्थ हॊतॊ ६ वा  महिना तर मराठीतला अर्थ हॊतॊ निबर. त्यामुळे फक्त विविक्षित स्वरामुळे ईश्वरी शक्ती चेतावते असं मानणं म्हणजेच अज्ञान आहे. 
२. दुसरा तंतू अग्नी बाळगतो. आता अग्नि आणि कापूस एकत्र आल्यावर राखेशिवाय काय उरणार आहे. 
३. नवनाग . आता रानावनात राहणाऱ्या नागासापांचे कापसाशी काय काम, काय संबंध? पण तो आहे त्या जानव्यात . 
४. सोम म्हणजे चंद्र. पृथ्वीच्या ह्या उपग्रहाची जानव्यातील उपस्थिती अनाकलनीय आहे. 
५. पितर . हा जन्म जगताना  समजता समजत नाही  तिथे शेकडो वर्षांपूर्वी वर गेलेले पितर जानव्यात कशाला येतील. एक तर पुनर्जन्म आहेकी नाही ह्यावर एक मोठे प्रश्नचिन्ह, शिवाय  असलेल्या जन्माची शाश्वती नाही पितरांचे कुणी पाहिलेय  
६. प्रजापती: ब्रह्मदेव ४ तोंड असलेला हा देव 'काल्पनिक 'मानण्याशिवाय काही पर्याय आहे. siamese  twins जन्माला येतात पण ती फार काळ जगू शकत नाहीत. 
७. वायू म्हणजे वारा . वाऱ्याची निर्मिती भौगोलिक परिस्थितील बदलांनी होते इथे जानव्याचा काय संबंध 
८.. सूर्यनारायण एक अतिशय  तप्त वायूंचा काहीही ठराविक आकार नसलेला तारा . तो जवळ आला तर जानवेच काय परिधान करणाराही भस्मीभूत होऊन जाईल 
९. विश्वदेव आता हा आणखी कोणता नवीन concept 
सगळाच मानण्या ना मानण्याचा व्यवहार . कुठलाही असंदिग्ध पुरावा नाही. 
हे इथेच थांबलेले नाही. 
४ वेद ६ शास्त्र [ म्हणजे काय]१८ पुराणे १५ कला १२ मास ७ वार २७ नक्षत्रे 
वेद पुराणे हि मानव निर्मित आहेत आणि आधुनिक मान्यतेप्रमाणे त्यांचा काळही  फारसा प्राचीन नाही  . कोणतेही मानव निर्मित काम सत्याच्या, चिरंतन सत्याच्या कसोटीवर उतरूच शकत नाही. कारण त्यात  लिहिणार्याचे चैयक्तिक बायस  येणारच आहेत. वेद अपौरुषेय मानतात. हि संकल्पनाच अनाकलनीय आहे. लिपी नसल्यामुळे ते लिखित स्वरूपात उपलब्ध  नसतीलही पण मौखिक स्वरूपात तर हॊतेंच होते.आजही कोकणी भाषेची वेगळी परिस्थिती नाहीये. भाषा आहेच आहे पण मान्य लिपी नसल्यामुळे देवनागरी आणि रोमन अश्या दोन्ही लिप्यात लिहिली जाते.  जिथे जिथे मानव टोळ्यांनी वसाहती केलेल्या तिथे  तिथे त्यानीं स्वतःची स्वर योजना तयार केलेली जीन हळूहळू कालपरत्वे भाषेचं रूप घेतलेलं . त्यामुळे आफ्रिकेत वेद आढळत नाहीत. किंवा भारतात बनलेले वेद cantonese मध्ये नाही रचले गेले. जिथं स्वरांच्या स्थिरतेचा पत्ता नाही तिथे कुठल्याही  हिंदू रचनेला अंतिम सत्य मानणं नक्कीच चूक ठरेल  
अजून काही गमती. गंमतीच म्हणायला पाहिजेत. 
२७ नक्षत्रे ताऱ्यांच्या ठराविक रचना . त्या आपल्यालाच पृथ्वीवरूनच अश्या दिसतात कारण अर्था अर्थी एकमेकांशी त्यांचा काहीही संबंध नाही. चंद्रावरून वा मंगळावरून त्या   totally वेगळ्या दिसतील . 
१५ कला : बाजारात चौकशी करा आता किती आहेत म्हणून. plumbing ची कला होती का त्यात, आज plumbing शिवाय पान  हालणार नाही. 
पंचमहाभुते : एकदम tribal . पृथ्वी आप तेज वायू आकाश 
एकेकाळी ह्या नैसर्गिक गोष्टी अश्या का वागतात ह्याचा बोध नसल्यामुळे आदी मानवाने केलेले हे वर्गीकरण त्या काळात [कदाचित] योग्य होते, [कारण न्यूटन आमच्या देशात नाही पैदा झाला] पण आता ? ४००० वर likes मिळण्यासारखं ह्यात काय आहे. कि आम्हीही अजून त्या tribal  mind सेट मधून बाहेरच  पडलेलो नाही आहोत  आप म्हणजे पाणी दोन  भाग हायड्रोजन एक भाग प्राणवायू . अंतराळाच्या कुठल्याही कोपऱ्यात गेलात तरी. चिरंतन सत्य ते हे. आता पाणी आले कि त्याचे गुणधर्म येणारच. त्याची शास्त्रीय मीमांसा न करता त्याला डायरेक्ट महाभूत मानायचं आणि तेही आजच्या युगात. हे like करणाऱ्या समस्त बांधवांनो जरा तरी विचार करा
प्रकृती पुरुष पंच विषय ज्ञानेंद्रिये वेगळी कर्मेंद्रियर वेगळी
सर्व डोलारा कंसेप्ट्स वर उभारलेला. आजच्या काळातील वैज्ञानिक निकशांवर एकही तत्व खरं  ठरणार नाही.
शिवाय ह्याला जातीवाचक tone आहेच. कोणी म्हटलंय, काही ब्राह्मणेतर जाती वापरतात, पण सर्वाना अधिकार आहे ?SC /ST वापरतात ? एक मराठा लाख मराठा म्हणून समाज फोडण्याचे काम चालूच त्यात आणखी भर
हे सर्व सोडा आजच्या विज्ञानाने जे सिद्ध केली त्याची कास धरा कारण त्यामागे अभ्यास आहे संयुक्तिक विचार आहे. आणि ह्या बळावर पाश्चिमात्य देशांनी केलेली प्रगती आपल्यासमोर आहे.
पुराणातली वांगी पुराणातच बरीं असं आपणच म्हटलंय


No comments:

Post a Comment